गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १
‘आपल्या नातवंडांसाठीच्या आर्थिक संभाव्यता’ (The economic possibilities for our grandchildren) ह्या १९३० साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात अर्थतज्ज्ञ श्री. जे. एम. केन्स ह्यांनी जे भाकीत वर्तविले होते, ते असे : “२०३० सालापर्यंत जगातील जवळजवळ सर्वच आर्थिक समस्या सुटलेल्या असतील. महामंदीसारख्याच समस्या नव्हे, तर ज्या ज्या म्हणून मूलभूत आर्थिक समस्या आहेत, त्या सर्वच समस्यांची सोडवणूक होऊन, जग हे संघर्षमय युगातून निघून अधिकाधिक …